सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी-पातोंडा ता. चाळीसगाव – ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सोबत सुरक्षित बहिणी रहाव्यात यासाठी काम करायचे आहे.
लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रूपये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर 3000 रूपये मिळावे.यासाठी प्रयत्न करणार पातोंडा ता.चाळीसगाव येथे माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून “सन्मान कर्तुत्वाचा खेळ पैठणीचा” “जागर स्त्री शक्तीचा स्वाभिमानी बहिणींचा”हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.
खेळ पैठणीचा रंगला…..
यावेळी उपस्थित माता-भगिनींनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध भक्ती गीते सादर करून प्रेक्षकांचे वाहवा मिळविली.यावेळी स्पर्धकांनी आध्यात्मिक गिते,उखाणा, फॅन्सी ड्रेस, काव्य, फुगडी, गायन सादर करीत हजारो भगिनींना मंत्रमुग्ध केले. पैठणी साडीच्या प्रथम विजेत्या धनश्री दिपक पाटील द्वितीय बक्षीस मिना तुकाराम पाटील, तृतीय क्रमांक शुभांगी राहूल पाटील यांचा संपदा पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी.पंचायत समिती सदस्य अनुसयाबाई संजय पाटील,पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील नवदुर्गा वाघळी उत्सव प्रमुख प्रकाश सूर्यवंशी, प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष रत्नाताई पाटील,रिक्षा युनियन अध्यक्ष आबा साबळे, अशोक माळी, महिरे आप्पा, युवराज माळी, आशाताई महाले, सुनंदाताई राठोड, सामाजिक कार्यकर्ते संजय संतोष पाटील, माजी सरपंच रंगनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक महाले, स्वप्निल मोरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मीक महाले यांनी तर आभार सी आर पी संगीता पाटील यांनी व्यक्त केले.
पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.