सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एरंडोल येथे दि.१८ जुन ते २१ जुन दरम्यान संत सेना महाराज हॉल गढी खाली रविंद्र दौलत पाटील यांच्या घराशेजारी करण्यात आले असून सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान शिबिर होईल.
सदर शिबिर सर्वांसाठी मोफत असून शिबिरात योगासनां विषयी माहिती तसेच त्यांचे फायदे,प्राणायाम इत्यादी विषयी माहिती दिली जाणार आहे. स्त्री पुरुष मुलं मुली इत्यादींनी योग प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन योग प्रशिक्षक डी. टी.देशमुख यांनी केले आहे