सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी – आजपासून : विखरण, ता. एरंडोल येथे आषाढ कृ ।।7 शनिवार, ता.27/07/2024 ते आषाढ कृ ।।14 शनिवार ता. 03/08/2024 पर्यंत श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त हरीनाम किर्तन सप्ताहास सुरुवात होत आहे. यंदा या सप्ताहाचे 13 वे वर्ष आहे.गुरुवर्य वै.ह.भ.प. रामदास बाबा वरसाहेकर यांच्या आशीर्वादाने ह.भ.प गोविंद महाराज, वरसाडेकर व पंचमंडळ विखरण यांच्या कुशल मार्गदर्शनाने भव्य ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.दैनंदिन कार्यक्रम मध्ये-काकडा आरती व प्रार्थना /भजन सकाळी 5 ते 6, प्रवचन हरीपाठ दुपारी 4 ते 6, संकिर्तन रात्री 9 ते 11 वाजता होईल.
श्री.ह.भ.प. भरत महाराज, महेशवाडी(शनिवार),श्री.ह.भ.प. चिंतामण महाराज आडगाव(रविवार), श्री.ह.भ.प.
लखन(सोमवार),ह.भ.प. संजिवनीताई हकदेकर(मंगळवार),श्री.ह.भ.प.
वसंत महाराज हेडगाव(बुधवार),ह.भ.प. चंदाताई, खामगाव(गुरुवार),श्री.ह.भ.प. गुलाब महाराज, लोणकर(शुक्रवार),तर शनिवारी(काल्याचे कीर्तन साठी)श्री.ह.भ.प.गोविंद महाराज, वरसाडेकर सकाळीं 9 ते 11 या वेळेत ज्ञानदान करतील. दिनांक 1ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.तर
या सप्ताहाचा दिंडी सोहळा – शुक्रवार दि.02/08/2024 रोजी दुपारी 4 ते 7 पर्यंत राहील.शनिवार दि.03/08/2024 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम
सकाळी 11 ते 3 राहील.कार्यक्रमाचे ठिकाण- श्री संत शिरोमणी सावता महाराज माळी समाज मंगल कार्यालय, विखरण, ता. एरंडोल जि. जळगांव असल्याचे माळी समाज अध्यक्ष अनिल मगरे, उपाध्यक्ष रमेश महाजन सह आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.