सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी– गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे एरंडोल येथील बस आगाराचे जवळपास दीड ते दोन लाखाचे उत्पन्न बुडाले आहे.तसेच या आगाराच्या पुणे व सेलवास या लांब पल्ल्याच्या बसगाड्या निम्मे रस्त्यावरून परत आल्या आहेत.
धुळे आगार बंद असल्यामुळे सेलवास व इतर गाडी माघारी आली तर चाळीसगांव पासून प्रवासी नसल्यामुळे पुणे गाडी परतीच्या प्रवासाला लागली.या आगाराच्या २० गाड्या गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना झाल्या आहेत.उर्वरीत २२ गाड्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व ग्रामीण भागातील बस फेऱ्या नियमित सुरू आहेत.अशी माहिती एरंडोल बस आगार व्यवस्थापक निलिमा बागुल यांनी दिली आहे.लांब पल्ल्याच्या सर्व सेवा बंद आहेत .