कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत रमेश चौधरी यांना पी एच डी प्रदान

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते व मार्गदर्शक डॉ.राहुलजी सनेर यांच्या उपस्थितीत पी.एच.डी. पदवी घेण्याचे भाग्य रमेश गोकुळ चौधरी ( नंदुरबार डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता ) यांना दि .५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनी प्राप्त झाले.

शालेय शिक्षणानंतर एस.एस.सी.डी.एड. ते विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) पदवीपर्यंतचा प्रवास हे ऐतिहासिक ध्येयपर्व सुरूच होते.शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो या बिद्रवाक्यान्वये असीम ध्येयाने प्राथमिक शिक्षक ते जिल्हास्तरीय अधिकारी पदापर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता भगिरथ प्रयत्नाने वाढवितांना डायटला अध्यापन करीत असतांनाच मला अध्ययनात अवर्णनीय व अजोड अद्वैतीय परमानंद प्राप्त झाला. पी एच डी प्राप्ती पर्यंतच्या या सुखद प्रवासात शालेय शिक्षणापासून तर आजतागायत अनेक गुरुवर्य , शिक्षक, सन्मित्र यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनाच्या फलश्रुतीने इथपर्यंत पोहोचता आले. समस्त मार्गदर्शकांच्या ऋणात मी आजन्म राहू इच्छितो अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ अधिष्ठाता डॉ.रमेश चौधरी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!