वरखेडे तांडा येथील मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-वरखेडे तांडा येथील कै.कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६.२.२०२४ रोजी घडली होती.

मयत कांतीलाल राठोड यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे होते. याबाबत समाजकल्याण विभागाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली व कै. कांतीलाल राठोड यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असता , ती आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!