अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, तपास सुरू

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-अमळनेर तालुक्यातील नगाव येथून 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.सदर मुलगी ही 9 डिसेंबर रोजी रात्री पहाटे बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,अमळनेर येथील नगाव येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसह राहते.मुलीची आई मयत झाली आहे . 9 डिसेंबर रोजी रात्री वाजता टीव्ही पाहून ती आपल्या आजीजवळ झोपली होती. पहाटे 1 वाजता आजी बकऱ्या बघायला उठली असता तिला आजूबाजूला तिचा शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. आजीने दिलेल्या फिर्यादनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!