(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-: विखरण तालुका एरंडोल येथील रहिवासी श्री त्रंबक धुडकू अहिरे यांची चिरंजीव श्री सचिन त्र्यंबक अहिरे दिनांक 31 डिसेंबर रोजी नेदरलँड येथे रवाना झाले आहेत.

त्यांना कंपनीकडून अभियांत्रिकी क्षेत्रात बढती मिळून ते परदेशात नोकरीसाठी जात आहेत.एरंडोल तालुक्यातील विखरण या लहानशा गावात एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या श्री. अहिरे यांनी परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता मेहनत, कष्ट आणि दृढनिश्चयाच्या जोरावर आपल्या जीवनाचा मार्ग तयार केला. त्यांचे जीवन हे सिद्ध करते की शून्यातूनही विश्व निर्माण करता येते.त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम,अहिरे परिवार व विखरण येथील ग्रामस्थांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

