सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास प्रतिनिधी/ टीम –विधानपरिषदेतील भाजपचे चार, शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे दोन, तर अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक अशा एकूण ११ आमदारांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहेत. त्यामुळे ,विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार असून, त्यासाठी आज, २५ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.२ जुलै २०२४ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुटीव्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.