पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास टीम -:

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर, शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने निवडणूक आयोगाने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत.सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून, मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जे मतदार ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशांसाठी कोणते कागदपत्रे सादर करावेत याची सूची कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!