सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास टीम/ प्रतिनिधी – सामाजिक,शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी एरंडोल येथील भुमीपुत्री व सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत कु.जयश्री संतोष महाजन यांची महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या एरंडोल तालुक्यासाठी युवती तालुकाध्यक्ष पदी नियुक्तीपत्रा व्दारे नियुक्ती केली.
नियुक्तीपत्र महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या हस्ते देण्यात आले.
शेतकऱ्यांना विशेष करून शेतकऱ्यांच्या लेकींना विविध प्रकारच्या अडचणी येत असतात व त्यांना न्याय देण्याचे कार्य कु.महाजन यांनी तालुक्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी व शेतकरी वर्गाला संघटनेच्या एका छताखाली एकत्र आणून संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी,युवक-युवती, कामगार वर्गापर्यंत पोहचवून संघटना मजबूत करणे व मदत करणे अभिप्रेत असल्याचे नियुक्ती पत्राद्वारे सांगितले आहे.
यावेळी मृद व जलसंधारण समिती तालुकाध्यक्ष एस झेड पाटील, एरंडोल चे व्यापारी संतोष महाजन,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र महाजन,निकिता महाजन उपस्थित होते.