सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- प्रतिनिधी / टीम-
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट सक्तीचे केले होते. पण लांबच्या लांब रांगा लागल्यानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. या दोन्ही दाखल्यांची अट सरकारनं शिथील केली आहे.
सरकारनं महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि नोंदणीसाठी गावागावात, तहसीलच्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागतायत. महिला अक्षरश: ताटकळत उभ्या राहताय.
तर पत्नीची कागदपत्र तयार करण्यासाठी पतीही रांगेत लागलेत. गर्दी उसळण्याचं कारण म्हणजे सरकारनं नोंदणीसाठी दिलेली 15 जुलैपर्यंतची मुदत. हातात फक्त 15 दिवसच होते.पण आता ती वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.