सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी पारोळा –
आज ६ जुलै रोजी मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा व पी.एम.किसान योजनेबाबत होत असलेल्या भटकंती व गैरसोयीची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी गंभीरे, नायब तहसीलदार एस.के. पाटील, पिक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, पिक विमा एरंडोल तालुका प्रतिनिधी चेतन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
यावेळी पिक विमा धारक ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारी नोंदविलेल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, तसेच येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांचा बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची इतरत्र भटकंती अथवा गैरसोय होता कामा नये यासाठी खबरदारी घेण्यात यावे.
तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होतांना दिसत आहे, सर्व आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर सुद्धा या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, त्यासाठी शेतकरी तहसिल कार्यालय, सी.एस.सी सेंटर येथे फेऱ्या माराव्या लागतात, यासाठी तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना याबाबत होत असलेली गैरसोय कशी दुर होईल यासाठी नियोजन करण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थितांना दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील उपस्थित होते.