स्वयंपाक घरातील आरोग्यवर्धक मसाले
◇ वेलची : सुवासिक वेलची शुक्राणूवर्धक आहे. त्याचबरोबर ती शरीरात थंडावा निर्माण करते. अजीर्ण झाल्यास, ढेकर येत असल्यास वेलची खावी. कोरडा खोकला आणि आवाज बसल्यास वेलची खावी.
◇ मोहरी : त्वचा विकार, अर्धांगवायू, संधिवात, आमवात, खांदा जखडणे, मान-गुडघ्याचे विकारांवर याचा वापर होतो. हिवाळ्यात मोहरीचं तेल जेवणात वापरणे फायदेशीर आहे. उचकी, कफ, दमा, खोकल्यावर मोहरीचा काढा द्यावा.