सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज व पोटजातीतील दहावी, बारावी, पदवी, व वरील वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ देण्यात येते.
शिष्यवृत्तीसाठी २५ जुलै शेवटची तारीख असून तोपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरने यांनी केले.अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
सदर कागदपत्रे दोन प्रतीत अर्जासोबत जोडून अर्जासह जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक या पत्त्यावर २५ जुलैपर्यंत पाठवावेत.